Bhimarupi (Maruti Stotra) Song Song lyrics | भीमरूपी | Ekda Kay Zala | New Marathi Song 2022 | Dr. Saleel Kulkarni
Bhimarupi (Maruti Stotra) Song lyrics |
भीमरूपी | Ekda Kay Zala | New Marathi Song
2022 | Dr. Saleel Kulkarni
![]() |
credit:Everest Marathi |
Everest Marathi वर 'एकदा काय झाला' या आगामी मराठी चित्रपटातील (मारुती स्तोत्र)" हे मराठी गाणे सादर करत आहे. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी. समर्थ रामदासांनी गीते लिहिली आहेत. उर्मिला कोठारे, सुमीत राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Credit of Bhimarupi Marathi (Maruti Stotra) | गाण्याचे श्रेय : भीमरूपी
Revival गीतकार - समीर सामंत
संगीत - डॉ.सलील कुलकर्णी
गायक - रुक्मिण पटवर्धन, देवी लवेकर, आद्य पोतदार, अनन्या काळे, अंशुल बोपर्डीकर, केदार जोग, चारुल पाटील, जय परांजपे, कनई निमिषे, सार्थक देशपांडे
Bhimarupi (Maruti Stotra)Lyrics:
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना !!
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका !!
उड्डाण करत ये हनुमंता
हुंकार भरत ये हनुमंता
दुष्टवृत्तीसंहार करत संचार करत ये हनुमंता !!
भीमरूपी महारुद्रा !!
दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा
पाताल देवता हंता भव्य शेंदूर लेपना !!
भीमरूपी महारुद्रा !!
विश्वासाची संजीवनी दे दूर होऊ दे शंका
द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका
तू शुद्ध भाव दे , भक्ती दे
अन्याय हारण्या शक्ती दे
दुष्टवृत्तीसंहार करत संचार करत ये हनुमंता !!
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना
पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका !!
भीमरूपी महारुद्रा !!
हृदयांना जोडणारा एक सेतू बांध तू
अंतरीच्या अंतराचा महासागर लांघ तू
तू झेप घे , तू धाव घे
तू या मनीचा ठाव घे
दुष्टवृत्तीसंहार करत संचार करत ये हनुमंता !!
भीमरूपी महारुद्रा !!
तू बुद्धीला वेग दे
धनधान्य पशुवृध्दि पुत्रपौत्र समस्तही
शक्तीला आवेग दे
पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया
भक्ती दे विश्वास दे
भूतप्रेत समंधादि रोगव्याधी समस्तही
तू पुन्हा मोकळा श्वास दे
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने
तू ज्ञानाची आस दे
हे धारा पंधराश्लोकी लाभली शोभली भली
तू विज्ञानाची कास दे
दृढ देहो निःसंदेहो संख्या चंद्र कलागुणे
तू सत्याचा ध्यास दे
रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मंडणू
सार्थकता जन्मास दे
रामरूपी अंतरात्मा दर्शने दॊष नासती !!
!! जय जय रघुवीर समर्थ !!
Comments
Post a Comment