Jeev Nadavala song lyrics | जीव नादावला Marathi song | Saptsur Music
युट्यूब चॅनेल सप्तसूर म्युझिक सादर करत आहे नवीन रोमँटिक मराठी गाणे, "जीव नाडावला" | जीव नादावला , ज्यामध्ये अक्षय आठरे आणि सुप्रिया सोन्नेकर आहेत. हे गाणे केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक यांनी गायले आहे. मनीष अनसुरकर यांचे संगीत. सचिन कांबळे दिग्दर्शित. साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी निर्मिती केली आहे.
![]() |
Credit :सप्तसूर म्युझिक |
Credits of Jeev Nadavala Marathi song | जीव नादावला गाण्याचे श्रेय
गीत - जीव नादावला.
गायक - केवल वाळंज आणि स्नेहा महाडिक.
संगीतकार - मनीष अनसुरकर.
गाण्याचे बोल - मनीष अनसूरकर.
Jeev Nadavala Marathi song Lyrics:
पायलं तुला ग मन हरखून गेलं
इसरून गेलं ,भान हरपून गेलं
खुळ्यागत खुळावला जीव यो खुळा..
येड्या गत पिसावला तुला भुलला..
जीव नादावला....
तुझ्या इशकात, जीव ह्यो नादावला..
जीव नादावला....
तुझ्या इशकात ,जीव ह्यो नादावला..
----------संगीत-----------
प रं सा रे ग ग रे सा ग ग रे सा रे...
ग रे ग ग रे सा रे ग ग रे सा रे ग ग रे सा सा म
सुवास तुजा कस्तुरी श्वासात भिनला..
भास तुजा अंतरी डोळ्यात भरला..
रोज रातीला जशी सपनामदी,
येतेस तशी येशील कधी..
हासनं तुजं लाजनं, भर उन्हात चांदनं
नजरेला नजरेचं , नजरेनं सांगनं
रुपडं तुजं बघून जीव आसावला ....
जीव आसावला..
तुज्या इशकात जीव ह्यो नादावला..
जीव नादावला .. हो ...
तुज्या इशकात जीव ह्यो नादावला...
----------संगीत-----------
हो ... सारं रोजचं ,वाटं नवं
खूळ ह्ये तरी,हवं हवं
काय सांगू रे ... होतंय कसं
पीस होऊनी ,मन उडतय जसं
येशील जवा तू माझ्या सामोरी..
काहूर दाटल होईल धडधड उरी..
तुझ्यासाठी साजते, स्वतःशीच लाजते
तुझ्यासाठी साजते, स्वतःशीच लाजते
पिरतिनं तुज्या जीव भारावला.....
जीव नादावला ...
तुज्या इशकात जीव ह्यो नादावला..
जीव नादावला ...
तुज्या इशकात जीव ह्यो नादावला..
पायलं तुला न मन हरखून गेलं
इसरून गेलं भान हरपून गेलं
कळना ह्यो लागला तुजा कसा लळा..
फुलारला पिसारा मन मोराचा निळा...
जीव नादावला....
तुझ्या इशकात जीव ह्यो नादावला
Comments
Post a Comment