अंगाई | Angai Official marathi Song lyrics | Ekda Kay Zala | Marathi Song 2022 | Saleel Kulkarni | Sunidhi Chauh

अंगाई  |  Angai Official marathi Song lyrics | Ekda Kay Zala | Marathi Song 2022 | Saleel Kulkarni | Sunidhi Chauh

Angai Official marathi Song
credit : Everest Marathi


सुनिधी चौहानने गायलेले 'एकदा काय झालं' या आगामी मराठी चित्रपटातील "अंगाई" हे मराठी गाणं तुमच्या भेटीस आलेलं आहे . संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी. संदीप खरे यांनी गीते लिहिली आहेत. उर्मिला कोठारे, सुमीत राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


Credit of Angai Marathi Song | गाण्याचे श्रेय : अंगाई 


गाण्याचे शीर्षक - अंगाई

गीत - संदीप खरे

संगीत - डॉ.सलील कुलकर्णी

गायिका - सुनिधी चौहान

संगीत व्यवस्था आणि कार्यक्रम - इंद्रजीत शर्मा


Angai marathi song lyrics


निजली रात निजे चांदोबाही 

बाळाला झोप का ग येत नाही...


निजली रात निजे चांदोबाही 

बाळाला झोप का ग येत नाही...


सांगता सांगता माझी दमली कहाणी 

मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी

 

गुणगुण करतांना शिणली अंगाई 


निजली रात निजे चांदोबाही 

बाळाला झोप का ग येत नाही...


----------संगीत-----------


धावुनिया तुझ्यापाठ , दिस गेला सारा 

घरभर सारा तुझ्या, खेळाचा पसारा..


धावुनिया तुझ्यापाठ , दिस गेला सारा 

घरभर सारा तुझ्या, खेळाचा पसारा..


मागितले जे जे तुला दिले मी आणून

सारे देता येते नीज आणावी कुठून 


ज्योत जीवाची जीवाने का रे उजळत नाही 


hmm..

बाळाला झोप का ग येत नाही...


----------संगीत-----------


हे पहा  - Chandra marathi song lyrics | चंद्रा  marathi song lyrics | Chandramukhi


नको दचकू असा मी कुठे जात नाही

बाळ जागे आणि कधी निजते का आई


नको दचकू असा मी कुठे जात नाही

बाळ जागे आणि कधी निजते का आई


फार फार भागलास आता घे विसावा

सारा सारा शिणवटा मिटू मिटू यावा 


तुझे सोसणे हे मला सोसवत नाही 


hmm..

बाळाला झोप का ग येत नाही...


hmm..

बाळाला झोप का ग येत नाही...


निजली रात निजे चांदोबाही 

बाळाला hmm...


Comments