Re Kshana Marathi Song lyrics 2022 | रे क्षणा marathi song lyrics |Shankar Mahadevan|Ekda Kay Zala

Re Kshana Marathi Song lyrics 2022 | रे क्षणा  Marathi song lyrics |Shankar Mahadevan|Ekda Kay Zala 

'एकदा काय झाला' या आगामी चित्रपटातील हे एक सुंदर मराठी गाणे आहे.  रे क्षणा गाणे शंकर महादेवन ह्यांनी गायले असून , ह्या गाण्याचे संगीतकार Dr.सलील कुलकर्णी आहेत, आणि ह्या गायचे बोल संदीप खरे आणि Dr.सलील कुलकर्णी ह्यांनी लिहिले आहेत.   ह्या चित्रपटात उर्मिला कोठारे आणि सुमीत राघवन हे प्रमुख कलाकारआहेत.




Credits of Re Kshana Marathi song| रे क्षणा गाण्याचे श्रेय 

गीत- रे क्षणा

गायक - शंकर महादेवन

संगीतकार - Dr.सलील कुलकर्णी

गाण्याचे बोल - संदीप खरे , Dr.सलील कुलकर्णी

चित्रपट - एकदा काय झालं


Re Kshana Marathi Song Lyrics:

ही वादळे हृदयातली, देतो तुला घेशील ना...

स्वप्ने खुळी डोळ्यांतली, देतो तुला घेशील ना...


ही वादळे हृदयातली, देतो तुला घेशील ना...

स्वप्ने खुळी डोळ्यांतली, देतो तुला घेशील ना...


ही पाखरे बघ चालली , क्षण घेउनी एकेक हा ..

रे क्षणा... थांब ना .. गाऊ दे एक गाणे पुन्हा .. रे क्षणा थांब ना..


----------संगीत-----------


ईश्वराचे रंग हे, दाही दिशांना विखुरले 

कण वेचले नादावुनि काही तरीही राहिले...


हो.... ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले 

कण वेचले नादावुनि काही तरीही राहिले...


जे वेचले ते ठेव तू , जे राहिले ते वेच तू..

या तुझ्या इवल्या मुठीतून, स्वप्न हे जपशील ना...


रे क्षणा... थांब ना .. गाऊ दे एक गाणे पुन्हा ..थांब ना..


हे हि पहा  -  तुला पाहुन | Tula Pahun Marathi song lyrics | Sayali Sanjeev | Nitish Chavan | Niranjan Pedgaonkar | Tips Marathi



Comments