Sukh Kalale | Riteish Deshmukh | Genelia Deshmukh
गाणे - सुख केले
संगीत : अजय-अतुल
गीत: अजय-अतुल
गायिका - श्रेया घोषाल
Sukh Kalale lyrics
करूनि अर्पण तुला समर्पण
घरात घरपण मी आज पाहिले
ऋणानुबंधात गीत गंधात
मि आनंदात मि आज गायिले मि पाहिले
दिस वाटे वेगळा अन लागे का लळा
हे वेडे मन माझे पुरतेच भाळले
सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
दोर जुळले
अंतरंगाने देहअंगाने स्पर्श केला
अन वाटे स्वर्गच आला हाताला
स्वप्न जे होते पूर्ण ते झाले
मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला
वचनांचे अर्थ मी बंधन हे सार्थ मी
अर्धांगी समजुनी संपूर्ण पाळले
सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
मन जुळले
प्रार्थना होती सात जन्माची
भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावी माथ्याला
पूर्तता झाली सोनपायाने
आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला
जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे
तू एका गजरयाने केसात माळले
सुख कळले कळले
कळले ना कसे असे सूर जुळले
मन जुळले
Comments
Post a Comment