Sukhkarta Dukhharta Lyrics In Marathi | सुखकर्ता दुखहर्ता | Ganesh Aarti

Sukhkarta Dukhharta Lyrics In Marathi |

सुखकर्ता दुखहर्ता | Ganesh  Aarti 


भाद्रपद महिना सुरू झाला की, सर्वांनाच गणपतीच्या आगमनाची प्रतीक्षा असते. गणेश चतुर्थी उत्साहात आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात सकारात्मकतेची भावना येते. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रीगणेशाचा जप, पूजा आणि आराधना करत आहे.पार्थिव सिद्धिविनायक पूजेनंतर सकाळी ९ च्या आधी आणि संध्याकाळी प्रदोष वेळेनंतर आरती करण्याची प्रथा आहे.




Shri Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती 


Sukhkarta Dukhharta Lyrics


सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची|

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |

कंठी झरके माल मुक्ताफळाची ||


जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||


रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरे जडित मुकुट शोभतो बरा

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||


जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||


लंबोदर पितांबर फनी वरवंदना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना


जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||


Comments