Baba Sad Song | बाबा | Sagar Anant Patil | Vinod Patil | Pravin Patil |Marathi Song
Details of Baba Sad Song
कलाकार : प्रवीण अनंत पाटील, अथर्व प्रविण पाटील, आर्य प्रविण पाटील, अर्णव विनोद पाटील
गायक : विनोद अनंत पाटील आणि सागर अनंत पाटील
संगीत दिग्दर्शक आणि गीत : सागर अनंत पाटील
Baba marathi song Lyrics :
बाबा तुझ्या आठवणीनं
जीव झाला येडापिसा
शोधू कुठं तुला आता
पुऱ्या झाल्या दाही दिशा
बाबा तु...............
केला आम्हा पोरका
----------संगीत-----------
लहानपणीच्या आठवणीनं
डोळ्यात पाणी तरले कसे
आम्हा खांद्यावरती नेताना
पायात तुझ्या काही नसे
जीवनाच्या वाटेमधी
सोडून गेलास गगनामधी
तुझी वाट पाहे सारखा
बाबा तु...............
केला आम्हा पोरका
----------संगीत-----------
संघर्षाशी झटताना
खंबीर तुझी साथ असे
आम्हास सोडून गेल्यावर
कुठलीच वाट उरली नसे
परतुनी येना घरी
आशीष असू दे आम्हाव
तुझी वाट पाहे सारखा
बाबा तु...............
केला आम्हा पोरका
Comments
Post a Comment