Phite Andharache Jale | फिटे अंधाराचे जाळे | Asha Bhosle | Sudhir Phadke | Laxmichi Paule (1982) | Sudheer Moghe
Phite Andharache Jale | फिटे अंधाराचे जाळे | Asha Bhosle | Sudhir Phadke | Laxmichi Paule (1982) | Sudheer Moghe
गीतकार : सुधीर मोघे
गायक : आशा भोसले - सुधीर फडके
संगीतकार : श्रीधर फडके
चित्रपट : लक्ष्मीची पाऊले (१९८२)
Phite Andharache Jale marathi song lyrics
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यांतून वाहे...
एक प्रकाश प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
----------संगीत-----------
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या..
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी...
संगे जागल्या साऊल्या
एक अनोखे लावण्य
आले भरास भरास
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
----------संगीत-----------
दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने..
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे...
जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
----------संगीत-----------
हे हि पहा - Dhundi Kalyana | धुंदी फुलांना |Asha Bhosale | sudhir phadke | Marathi gani
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख..
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख..
चांदण्याला किरणांचा..
सोनसळी अभिषेक
चांदण्याला किरणांचा..
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही..
सारे रोजचे तरीही..
नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यांतून वाहे...
एक प्रकाश प्रकाश
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
Comments
Post a Comment